+9145748490 Mon-Sat:6:00 AM - 10:00 PM

गुळाचा चहाचा एक आगळा वेगळा प्रवास

गाढवे बंधूचा आरोग्यदायी चेअरमन गुळाचा चहा

गुळाचा चहा हे ग्राहकांना आरोग्यास पूरक आणि स्वादिस्ट असा अस्सल गुळाचा चहा पुरवणारे अमृततुल्य आहे.आमचा असा विश्वास आहे कि चहा हे फक्त पेय नसून ते आपले आरोग्य संतुलित करणारे आणि आपली कार्यक्षमता वाढवणारे पेय आहे.

रेस्टॉरंट इंडस्ट्री मध्ये काम करायची प्रचंड आवड आणि बाजारातील वाढत्या अमृततुल्य आणि कॅफेसचा गर्दीत एक ठिकाण असेच असावे जिथे ग्राहकांना खऱ्या अर्थाने आरोग्यदायी चहा मिळेल.याच प्रामाणिक उद्देशातूनच आम्ही गुळाचा चहाची स्थापना केली आहे. गाढवे बंधूचा आरोग्यदायी चेअरमन गुळाचा चहा चा माध्यमातून विविध आरोग्यदायी पेय ग्राहकांना उपलबद्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे.

गुळाचा चहा हा मुळातच आपल्या पूर्वजांनपासून चालत आला आला आहे. सकाळी काम करण्यासाठीचा उत्साह आणि ऊर्जा आणण्यासाठी व संध्याकाळी थकवा घालवण्यासाठी गुळाचा चहा हाच सर्वोत्तम पर्याय असायचा. गुळाचा चहा विना कोणाचीच न्याहारी पूर्ण होत नसे. पण काळाबरोबर मोठ्यांचे अमूल्य आणि आरोग्यदायी ध्यान मागे पडले , गुळाच्या चहा ऐवजी साखरेचा वापर वाढू लागला.चहाप्रेमींना काय हवे आहे हा पहिला प्रश्न मनात आला. आम्हाला वाटते की उत्तर सोपे असेल, सर्वोत्कृष्ट चव, आनंददायक सुगंध, स्वच्छ दुकान आणि सुसज्ज बसण्याची व्यवस्था.

  • आमच्या चहामध्ये ताजे आणि दर्जेदार घटक वापरतो.
  • आम्ही पॅकेज केलेले पिण्याचे पाणी वापरतो.
  • आम्ही कोणत्या हि प्रकारचे हानीकारण पदार्थ नाही वापरत.

आम्ही सर्वोत्तम का आहोत

आमचा असा ठाम विश्वास आहे कि कालिटी हि एकमेव गोष्ट आहे.जी ग्राहकांना फक्त संतुष्टच नाही तर खऱ्या अर्थाने तृप्त करू शकते आणि आमचा बद्दलची विश्वासार्हता वाढवू शकते. "गाढवे बंधूचा आरोग्यदायी चेअरमन गुळाचा चहा" प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारी आश्चर्यकारक चव..

01

उत्तम चवीचा चहा

मिनरल पाणी, सात्विक दुध, उत्तम दर्जाची चहापत्ती आणि सुंठ, वेलदोडे, दालचिनी, लवंग इ. नैसर्गिक पदार्थ वापरून आम्ही स्वतः तयार केलेला चहाचा मसाला, या सर्वांचं योग्य प्रमाण वापरून आम्ही उत्तम चहा ग्राहकांना देतो.

02

स्वच्छता आणि नीटनेटकेपणा

आम्ही प्रत्येक आऊटलेटमध्ये स्वच्छतेवर जास्त लक्ष केंद्रीत करतो. चहा घेतांना प्रत्येक ग्राहकाला फ्रेश व उत्साही वाटेल असे वातावरण नेहमी आपल्या अमृततुल्यमध्ये असावं यासाठी आम्ही आग्रही असतो.

03

कामगारांना प्रशिक्षण

ग्राहकांसोबत कसा संवाद साधावा?, चहाची चवीचा दर्जा कसा राखावा? अशा प्रकारचे प्रशिक्षण आम्ही कामगारांना देतो. जेणेकरून ग्राहक नेहमी अमृततुल्यला येण्यास पसंती देतात.

गुळाच्या चहामध्ये दडलय निरोगी आयुष्याचं रहस्य...

अनेकजण दररोज साखरेचा चहा पितात. साखरेचा चहा पिणं आपल्या आरोग्याला घातक ठरू शकतं. साखरेचे जास्त सेवन केल्याने भविष्यात मधूमेह होण्याची शक्यता असते पंरतु, तुम्ही चहामध्ये साखरेऐवजी गुळ टाकला तर ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हिवाळ्यामध्ये गुळाच्या चहा (Jaggery Tea) प्यायल्याने विविध फायदे होतात. गुळामध्ये साखरेपेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स असतात. गुळ हा उष्ण पदार्थ आहे.

पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

गुळ गॅस आणि पचनाशी संबंधीत समस्याही दूर करतो. जेवण केल्यानंतर थोडा गुळ खावा त्याने पचनही चांगलं होतं आणि गॅसची समस्याही दूर होते .

गुळ हा एक पाचक पदार्थ आहे. यासाठी जेवणानंतर अनेक ठिकाणी गुळ खाण्याची पद्धत आहे. ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत राहते आणि शहरातील हानिकारक गोष्टीला बाहेर काढते तुम्हाला अपचनाचा त्रास कमी होतो.

सांदेदुखी वर अतिशय उपयुक्त.

जर तुम्हाला खूप जास्त थकवा जाणवत असेल, तेव्हाही गुळ खाणे अधिक फायदेशीर असू शकतं. थकवा जाणवल्यास थोडा गुळ पाण्यासोबत घेतल्यास तुम्हाला आराम मिळेल.

रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत होते.

थंडीचे प्रमाण वाढल्यास शरीराला सुरक्षित राहण्यासाठी उष्णतेची गरज असत. अशा वातावरणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि तुम्हाला सर्दी, खोकला, ताप असे आजार होतात. मात्र गुळातील अंटिऑक्सिडंटमुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम तुमच्या शरीरावर होत नाही. यासाठीच थंडीत गुळ घातलेले लाडू अथवा पेज केली जाते

अशक्तपणा दूर करण्यासाठी मदत होते.

गुळामध्ये लोह आणि फॉलेट असल्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते.

जर तुमच्या शरीरात अशक्तपणा अथवा अॅनिमियामुळे लाल रक्त पेशी कमी झाल्या असतील तर गुळ खाण्याने चांगला फायदा होऊ शकतो. नियमित गुळ सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील लोहाचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते

रक्ताची कमतरता दूर होते आणि ब्लड प्रेशर पासून रक्षण होते.

पूर्वी बाहेरून घरी आल्यावर अथवा घरी पाहुणे आल्यावर गुळ आणि पाणी देण्याची पद्धत होती. कारण थकून भागून घरी आलेल्या व्यक्तीला गुळ आणि पाणी पिण्यामुळे झटपट उर्जा मिळते फ्रेश वाटत असे यासाठीच अथवा अशक्तपणा जाणवत असेल तर पटकन गुळाचा एखादा छोटासा खडा आणि पाणी घ्यावे त्यामुळे तुम्हाला इंन्स्टंट उर्जा मिळू शकते

गाढवे बंधूचा आरोग्यदायी चेअरमन गुळाचा चहा

आम्ही कोण आहोत,आमच व्हिजन,मिशन

गाढवे बंधूचा आरोग्यदायी चेअरमन गुळाचा चहा व्हिजन,मिशन.

01

आम्ही कोण आहोत

गाढवे बंधूचा आरोग्यदायी चेअरमन गुळाचा चहा हे एक अग्रगण्य भारतीय चहाचे दुकान आहे जे अद्वितीय सुगंध आणि नेहमीच्या चहाच्या मिश्रणासाठी ओळखले जाते. प्रत्येकाच्या चहाचा कप असणे खरोखर एक मोठी उपलब्धी आहे

02

आमच मिशन

आमच्या सर्व ग्राहकांना स्वच्छ आणि अत्यधिक सर्व्हिस शॉपमध्ये गुणवत्ता आणि मधुर चहा पोचवा. आमचे ध्येय मैत्री अमृतुल्या चहाची उत्कृष्ट चव देणे आणि आपला विश्वास आणि आनंद मिळविणे हे आहे

03

आमच व्हिजन

बाजारपेठ ठिकाणी आमचे सर्वोत्तम स्थान तयार करत आहे. नाममात्र किंमतीवर सर्व समाजात अधिकाधिक रोजगार निर्माण करणे आणि फ्रेंचायझी व्यवसायासाठी संपूर्ण साखळीचे समाधान निश्चित करणे

आमची व्यवस्थापकीय टिम

आम्ही आमची कंपनी विकसित करीत आहोत जी समाजात सक्रियपणे सहभाग घेणारी, संरक्षक आणि कर्मचारी सदस्यांसाठी एक अनोखा आणि मैत्रीपूर्ण स्वागत अनुभव देईल..

राजेंद्र पांडुरंग गाढवे(चेअरमन)

सीईओ आणि संस्थापक क्लायंट हाताळणी आणि चहा मार्केटिंग तज्ञ

आदित्य राजेंद्र गाढवे

डिझायनिंग अँड मॅनेजमेंट डायरेक्टर डिझाईन आणि व्यवस्थापन मध्ये तज्ञ

रवींद्र पांडुरंग गाढवे

संचालक ग्राहक हाताळणी आणि बॅकएंड प्रक्रियेतील तज्ञ

आमच्याशी संपर्क साधा

“गाढवे बंधूचा आरोग्यदायी चेअरमन गुळाचा चहा ” येथे आपला वेळ तुम्ही किती उपभोगला आहे किंवा एखादा वैयक्तिक संदेश पाठवायचा असेल तर आम्हाला आमच्याबरोबर आपला अनुभव कसा चांगला द्यावा याबद्दल विधायक अभिप्राय प्रदान करण्यास स्वारस्य असल्यास, आम्हाला आपल्यास ऐकायला आवडेल ! आपल्याकडे व्यवसायाची कल्पना असल्यास किंवा व्यवसायाची लीड आमच्याशी संपर्क साधण्यास मोकळ्या मनाने असल्यास आणि आम्ही प्रतिसाद देऊ. आमच्या वेबसाइटवर आणि सोशल मीडिया चॅनेलवर देखील आपला व्यवसाय दर्शविण्यात आम्हाला आनंद होईल..

पत्ता:

फलटण असू रोड,
बसस्टँड समोर ,राजाळे.

उघडण्याची वेळ:

सोमवार-रविवार:
6:AM - 10 PM

ईमेल:

chairman@gmail.com

कॉल करा:

9145748490